“नृत्यालिका प्रतिष्ठान” पुरस्कृत “पंचरत्न पुरस्कार – २०२५” सोहळा संपन्न
“नृत्यालिका प्रतिष्ठान” पुरस्कृत “पंचरत्न पुरस्कार – २०२५” सोहळा संपन्न
नृत्यालिका प्रतिष्ठान पुरस्कृत “पंचरत्न पुरस्कार” हा मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच वडाला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात अत्यंत दिमाखदारपणे पार पडला. दरवर्षी महिला दिनानिमित्त ‘नृत्यालिका प्रतिष्ठान’ चा हा मानाचा “पंचरत्न” पुरस्कार विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि त्यात विशेष कामगिरी केलेल्या पाच महिलांना देण्यात येतो. यावर्षी सौ. आरती राजाध्यक्ष (अभिनेत्री व समाजसेविका), सौ. सोनाली पेडणेकर (शिक्षणतज्ञ), सौ. हर्षदा डोईफोडे (समाजसेविका), सौ. बिंदी असनानी (शिक्षणतज्ञ व समाजसेविका), सौ. सुरेखा तांबिटकर (आरोग्य व शिक्षणतज्ञ) या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. श्रीकृष्ण महिला उद्योगच्या अध्यक्षा सौ. कोमल घोले चौगुले यांच्या हस्ते सर्व महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच त्यांच्या तर्फे “नृत्यालिका” च्या संस्थापिका व अध्यक्षा डॉ. किशु पाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. “नृत्यालिका प्रतिष्ठान” ही भरतनाट्यम व लोकनृत्य क्षेत्रातील एक अग्रगण्य व नामवंत संस्था आहे. “नृत्यालिका” संस्थेच्या महाराष्ट्र व विदेशातही अनेको शाखा कार्यरत आहेत व त्यातून अनेक विद्यार्थीगण घडत आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि त्यात विशेष कामगिरी केलेल्या महिलांना, या अनमोल रत्नांना “पंचरत्न” पुरस्काराने पुरस्कृत करून त्यांची उमेद वाढविण्याचे काम “नृत्यालिका प्रतिष्ठान” गेली कित्येक वर्ष करीत आहे.