कलामंथन २०२५ – अनोखे कला प्रदर्शन मुंबईतील कमलनयन बजाज हॉल, नरिमन पॉइंट येथे
कलामंथन २०२५ – अनोखे कला प्रदर्शन मुंबईतील कमलनयन बजाज हॉल, नरिमन पॉइंट येथे
‘बुके ऑफ आर्ट गॅलरी’ आयोजित ‘कलामंथन २०२५’ ही अनोखी कला प्रदर्शनी २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ दरम्यान कमलनयन बजाज हॉल, नरिमन पॉइंट, मुंबई येथे भरणार आहे. या प्रदर्शनात देशभरातील नामांकित कलाकारांच्या समकालीन आणि पारंपारिक कलाकृतींचे दर्शन घडणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभ होणार असून यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार, अभिनेते अखिलेंद्र मिश्रा, राजेश पुरी, विजय कश्यप, पंकज बेरी, राकेश श्रीवास्तव, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीचे सहाय्यक संचालक संतोष पेडणेकर, आणि अध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख हेमंत जैन विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर प्रदर्शनात चित्रकार अखलेश के जी गौर, अल्पना कटारिया, अंकिता भटनागर, अविनाश सिंग, डॉ इशिता पुरकयाशता बिस्वास , दिनेश दोशी, गुंजन जैन, गृष्मा शाह, कमलाकार दीक्षित, माधवी भास्कर, मोनिका चंदना, नंदा पाठक, निखिल ऑम, पूजा विजयारंगन, प्रफुल्ल हुडेकर, प्रतिभा खेमचंदानी , कुरेश बसराये, शांती विंजामुरी , सुधा बार्शिकर आणि सोनल व्ही. सक्सेना या नामवंत कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश असेल.