डॉक्टर 365 बॉलीवुड महा आरोग्य शिबिर मध्ये उदित नारायण, स्मिता ठाकरे, गणेश आचार्या, धीरज कुमार, सुदेश भोसले यांची उपस्थिती
“डॉक्टर 365 बॉलीवुड महा आरोग्य शिबिर मध्ये उदित नारायण, स्मिता ठाकरे, गणेश आचार्या, धीरज कुमार, सुदेश भोसले यांची उपस्थिती
“डॉक्टर 365” चे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र कुमार आणि अभिनेता-निर्देशक धीरज कुमार ने रविवारी अंधेरीच्या चित्रकूट ग्राउंडमध्ये आयोजित “बॉलीवुड महा आरोग्य शिबिर” मेडिकल आणि हेल्थ कॅम्पमध्ये बॉलीवुडच्या सेलेब्रिटीसह टेक्निशियन, बॅकस्टेज कलाकार आणि मिडिया कर्मचारींची उपस्थितीत हजारों लोकांनी फायदा घेतला. त्यात गायक उदित नारायण, पद्मश्री डॉ सोमा घोष, स्मिता ठाकरे, गणेश आचार्य, आमदार भारती लवेकर, संगीतकार दिलीप सेन, सुदेश भोसले, सुनील पाल, वी आई पी, इजराइलचे कॉन्सुल जनरल कोबी शोशानी, जॉर्जियाचे कॉन्सुल जनरल सतेंद्र आहूजा, रोटरीचे अरुण भार्गव, सुंदरी ठाकुर यांच्यासाहित अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पूर्णपणे सुसज्ज अशा दोन रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या. ज्यातील एकाचे प्रायोजक सिडबीचे उप-प्रबंधक प्रकाश कुमार होते, तर दुसऱ्या रुग्णवाहिकेचे प्रायोजक दंगल टीव्हीचे प्रबंधक व्यवस्थापन मनीष सिंघल होते.
या प्रसंगी स्मिता ठाकरे यांनी म्हटलं की, त्यांना बॉलीवुड महाआरोग्य शिविरात सहभागी होऊन अत्यंत आनंद झाला. मुक्ति फाउंडेशन गेली अनेक वर्ष शिक्षा, स्वास्थ्य आणि सामाजिक सेवेच्या क्षेत्रात काम करीत असून अशा उपक्रमांना नेहमी सहकार्य करत आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचं धारक आर.के. एच.आय.व्ही. एड्स रिसर्च आणि केअर सेंटरचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र कुमार आणि क्रिएटिव आय लिमिटेडचे निर्माता-निर्देशक आणि अभिनेता धीरज कुमार ह्यांनी फ़िल्म, टीव्ही आणि मीडियासाठी “डॉक्टर 365 बॉलीवुड महा आरोग्य शिविर”चा आयोजन केलं होतं. या महा आरोग्य शिविराच्या आयोजनात मुक्ति फाउंडेशन, गणेश आचार्या फाउंडेशन, पी बी सी एजुकेशन आणि फाइनेंशियल सर्विसेस प्राइवेट लिमिटेड, ब्राइट आउटडोर मीडिया लिमिटेड, संगीता तिवारी ट्रस्ट, रोटरी डिस्ट्रिक्ट 3141, यूएफओ मूवीझ, एस बी आई फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय प्रकाश, एफ.डब्ल्यू.ए.आई.सी.ई., ९२.७ बिग एफएम, आणि इतर अनेक संस्थानी सहकार्य केले.
“डॉक्टर 365” चे डॉ. धर्मेंद्र कुमार यांनी म्हटलं की बॉलीवुड महा आरोग्य शिबिर चे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षी ५ लाख रुपयापर्यंतचे फ्री हेल्थ कार्ड आणि २ लाख रुपयापर्यंतचे श्रम कार्ड आवश्यकच्या लोकांना दिले गेले होते. प्रत्येक रोगासाठी येथे अनेक डॉक्टर्स उपस्थित राहिले. या वर्षी बालकांसाठीही अनेक विशेष सुविधा दिलेली होती. “चाइल्ड अस्थमा केयर” ह्या विशेष सुविधेचं अनुभव घेतलं. हृदय रोग तज्ञ, कॅन्सरसाठी स्पेशलिस्ट डॉक्टर, हड्डी, डॉक्टर्स, डोळे कान, एक्युपंक्चर, कायरोप्रॅक्टर, नाक आणि घसा साठीही स्पेशलिस्ट डॉक्टर्सचं एक टीम उपस्थित राहिलं होतं. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे, मोफत डॉक्टर्स तपासणी, मोफत डोळे तपासणी, चश्मा आणि व्हीलचेयरचं वितरण केलं.