‘छबिलदास शाळा’ दादर यांच्या संयुक्त विद्यमाने “तुम्हे याद करते करते” हा दृकश्राव्य कार्यक्रम रविवार २१ एप्रिल रोजी छबिलदास कट्ट्यावर
‘छबिलदास शाळा’ दादर यांच्या संयुक्त विद्यमाने “तुम्हे याद करते करते” हा दृकश्राव्य कार्यक्रम रविवार २१ एप्रिल रोजी छबिलदास कट्ट्यावर
‘छबिलदास शाळा’ दादर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचे माजी विद्यार्थी प्रा. कृष्णकुमार गावंड आणि ज्येष्ठ अभिनेते लेखक नारायण जाधव हे छबिलदास कट्ट्यावर शाळेच्या पटांगणात रविवार २१ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता “तुम्हे याद करते करते” हा दृकश्राव्य कार्यक्रम सादर करणार आहेत. निमित्त आहे ग्रेट शोमन राज कपूर यांचे ‘जन्मशताब्दी वर्ष’. त्या सुवर्णकाळातील शंकर जयकिशन यांची कारकीर्द, त्यासंबंधीचे किस्से रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर केले जातील. माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक उपक्रमास प्रतिसाद द्यावा. तसेच हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी देखील खुला आहे.
प्रा. कृष्णकुमार गावंड यांनी छबीलदास शाळेतील वर्गमित्र स्वर्गीय वसंत खेर आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्याबरोबर १९७६ साली ‘सिंफनी’ नावाची संस्था स्थापन केली होती, ज्याद्वारे यादे शंकर जयकिशन चे ५०० हून अधिक प्रयोग सादर केले होते. त्यांच्या पहिल्या प्रयोगाला आशीर्वाद देण्यासाठी संगीतकार शंकरजी स्वतः उपस्थित होते. त्यानंतर शंकरजींच्या अनेक भेटी त्यांच्या झाल्या आणि अनेक रेकॉर्डिंग पाहिली त्यामुळे अनेक किस्से त्यांच्याकडे आहेत. नारायण जाधव हे देखील शंकरजयकिशनचे प्रचंड फॅन आहेत. कृष्णकुमार गावंड यांनी गेल्याच वर्षी “यादे शंकरजयकिशन” नावाचे पुस्तक हे प्रकाशित केले आहे.