“एमईटी उत्सव २०२५” ला उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीय संस्कृतीचा भव्य आविष्कार


एमईटी उत्सव २०२५” ला उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीय संस्कृतीचा भव्य आविष्कार 

मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एमईटी) ने आयोजित केलेला “एमईटी उत्सव २०२५” हा भारतीय संस्कृती आणि प्रतिभेचा भव्य उत्सव विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात एमईटी कॅम्पस, भुजबळ नॉलेज सिटी, वांद्रे येथे साजरा झाला. एमईटी उत्सव २०२५ या वार्षिक महोत्सवाची थीम ‘संस्कृती’ होती. या सोहळ्याने भारताच्या समृद्ध वारशाला मानवंदना दिली आणि देशाच्या विविध पारंपरिक आणि कला परंपरांना सजीव केले.

Advertisement

ग्रँड फिनाले – एमईटी उत्सव २०२५ ची सांस्कृतिक रात्र हा एक नेत्रदीपक सोहळा होता, जो ऊर्जेने भरलेला आणि दिग्गजांच्या उपस्थितीने सजलेला होता. या शानदार रात्रीत हृदयस्पर्शी संगीत सादरीकरण, जोशपूर्ण नृत्यप्रकार, भव्य फॅशन शो आणि विनोदी स्टँड-अप परफॉर्मन्स यांचा समावेश होता, ज्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम मनोरंजनाने परिपूर्ण झाला. या सोहळ्यात एमईटी रत्न आणि एमईटी गौरव पुरस्कारांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार एमईटी चे संस्थापक अध्यक्ष मा. छगन भुजबळ, सन्माननीय विश्वस्त श्री. पंकज भुजबळ आणि श्री. समीर भुजबळ तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

एमईटी उत्सव या भव्य सोहळ्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि वीर पहारिया, पार्श्वगायिका जसपिंदर नरूला, बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि वामीका गब्बी, चित्रपट व टेलिव्हिजन अभिनेते चेतन हंसराज आणि संगीतकार सिद्धांत कपूर यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. एरियल डान्स परफॉर्मन्स आणि सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकांनी साकारलेल्या भव्य बॉलिवूड सीक्वेन्सने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. एमईटीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत कौशल्याने हे सादर करून कला, एकता आणि सर्जनशीलतेचा उत्तम मिलाफ सादर केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!